‘पाच फुटाचा बच्चन’

‘पाच फुटाचा बच्चन’
Published on: 
ABC26B09817 छत्रपती संभाजीनगर ः चित्रपटातील एक प्रसंग. -- ‘पाच फुटाचा बच्चन’ने केले अंतर्मुख -- छत्रपती संभाजीनगर : कीर्तन ही महाराष्ट्राची भक्तिपरंपरा आणि लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. मात्र, बदलत्या काळात त्याला प्रसिद्धी, पैसा आणि राजकीय हितसंबंधांची जोड मिळत आहे. या वास्तवाचा वेध ‘पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट कीर्तनकार राजलक्ष्मी हिच्या प्रवासातून घेतो. या शोचे आयोजन होल्डिंग हँड बहुद्देशीय संस्थेने सोमवारी (ता. दोन) केले होते. राजलक्ष्मीची भूमिका श्रुती मधुदीप यांनी साकारली. गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिज दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील, विनोद वणवे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभिषेक शेटे यांचं छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांचे संकलन, शंतनू-दिनेश यांचं ध्वनी आरेखन आहे. निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिलेले असून प्रदीप आवटे यांनी गीतलेखन केलेले आहे. स्क्रीनिंग निर्माता दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे, नायिका श्रुती मधुदीप, अभिनेत्री शलाका गाडे, होल्डिंग हँड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश सिरसीकर, सचिव डॉ. अपर्णा मेहता, उपाध्यक्ष रवींद्र बनकर, डॉ. सुधाकर शेळके, तिलोत्तमा झाडे, डॉ. रेखा शेळके, सुभाष बोंद्रे, किशोर शिरसाठ, मनोहर वानखेडे, बी.बी. नाईक, एस.डी. मुझफ्फर, प्राची सिरसीकर, शांता कांबळे, जय मांडवे, इंद्रकुमार जेवरीकर आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.