Chh. Sambhajinagar Accident: पाचोडमध्ये दोन अपघातांत दोन युवकांचा मृत्यू
Paithod Accident: पाचोड, ता. पैठण येथे दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन युवक जागीच ठार झाले. दुचाकी आणि स्विप्ट कारच्या जोरदार धडकांमुळे दोन्ही घटनास्थळी आपत्ती निर्माण झाली.
पाचोड : एकाच ठिकाणी परंतु वेगवेगळ्या झालेल्या दोन अपघातांत दोन युवक जागीच ठार झाल्याच्या घटना मंगळवारी (ता.१७ ) मध्यरात्री धूळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड (ता.पैठण) जवळ घडल्या.