पाचवा ‘पद्म फेस्टिव्हल’ २५ ते २७ नोव्हेंबर

पाचवा ‘पद्म फेस्टिव्हल’ २५ ते २७ नोव्हेंबर
Published on: 
पाचवा ‘पद्म फेस्टिव्हल’ २५ ते २७ नोव्हेंबरला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार उद्‍घाटन छत्रपती संभाजीनगर, ता. १४ : ज्ञानयज्ञ फाउंडेशनतर्फे पाचवा ‘पद्म फेस्टिव्हल’चे २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तीनदिवसीय महोत्सवाचे उद्‍घाटन २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:४५ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते एमआयटी येथील मंथन सभागृहात होणार आहे. उद्‍घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे संचालक जनरल अनिल चौहान (निवृत्त) उपस्थित राहणार आहेत. ग्राइंड मास्टर मशीन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद केळकर संमेलनाध्यक्ष असतील, तर केअर सिग्मा हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर स्वागताध्यक्ष असतील. २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी होणारे उर्वरित सर्व कार्यक्रम संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडतील. या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे निःशुल्क असून, ७० टक्के आसनव्यवस्था विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी ज्ञानयज्ञ फाउंडेशन संघ, मंगल केंडे आणि कांचन देशपांडे पुढाकार घेत आहेत. अधिक माहितीसाठी अमित जोशी, अतुल चपळगावकर, आयुष अग्रवाल, सर्जन कॅप्टन मोहन रोटे किंवा पद्मश्री केंडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाकची रूपरेषा २५ नोव्हेंबरला एमआयटीच्या मंथन सभागृहात दुपारी २ ते ३ः२० ला वैद्यकशास्त्र-एव्हिएशन मेडिकल तज्ज्ञ निवृत्त एअर मार्शल डॉ. पद्मा बंडोपाध्याय, दुपारी ३ः४० ते ५ः१० दरम्यान साहित्य आणि शिक्षणतज्ज्ञ रमेश पतंगे, तर सायंकाळी ५:२० ला डॉ. एन. राजम यांचे संवाद सत्र होईल. सायंकाळी ६:४५ ते ८:०० या वेळेत डॉ. एन. राजम आणि त्यांचे शिष्य अभिषेक सिन्हा यांच्या व्हायोलिन वादनाची प्रस्तुती होईल, त्यांना तबल्यावर अजित पाठक साथसंगत करतील. २६ नोव्हेंबरला संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी १० ते ११ः३० दरम्यान एअरोस्पेस वैज्ञानिक डॉ. शुभा व्ही. अय्यंगार, सकाळी ११ः३५ ते १ः०५ मनोविकारतज्ज्ञ डॉ. बी.एन. गंगाधर, दुपारी १ः१० ते २ः४० पॅरालिम्पिक भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया, दुपारी २ः४५ ला तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा आणि सायंकाळी ४ः२० ला कृषी क्षेत्रातील श्रीरंग लाड यांची संवादसत्रे पार पडतील. सायंकाळी ६ ला शास्त्रीय गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांचे संवादसत्र होईल. रात्री ७ः३० ते ९ दरम्यान पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या शिष्यवृंदाकडून (डॉ. चैती देशपांडे गुलवाडी, तन्वी जानोरकर, ईशानी हिंगे, गौरी मिश्रा) मंगलदीप या गीतांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाईल. त्यांना सिंथेसायझरवर मंदार पारखी आणि हार्मोनियमवर मनोज देसाई साथ करतील. --------- २७ नोव्हेंबरला संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी १० वाजता मार्शल आर्टस खेळाडू पद्मश्री फैसल अली डार यांचे संवादसत्र होईल. त्यानंतर सकाळी ११ः४५ ते दुपारी १:०० या वेळेत समारोप समारंभ पार पडणार असून, याप्रसंगी डेप्युटी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (मेडिकल) सर्जन व्हाइस ॲडमिरल कृष्णा एम. अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दुपारी १ः३० ला पर्यावरणवादी चामी मुर्मू आणि दुपारी ३:१० ला बांबू हस्तकला कलाकार जारदेन लेप्चा यांच्या सत्राने महोत्सवाची सांगता होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.