विकसित भारत" विषयावर चित्रकला स्पर्धांचे आयोजन

विकसित भारत" विषयावर चित्रकला स्पर्धांचे आयोजन
Published on: 
फोटो : फुलंब्री : वाकोद शाळेत चित्रकला स्पर्धा प्रसंगी मान्यवर. ..... ."विकसित भारत" विषयावर चित्रकला स्पर्धांचे आयोजन चित्रकला स्पर्धेत देवयानी,आराध्या तर रांगोळी स्पर्धेत वेदिकाने पटकाविला प्रथम क्रमांक फुलंब्री, ता.२६(बातमीदार) : केंद्र सरकार द्वारा निर्देशित सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद येथे २४ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली."विकसित भारत" या विषयावर दोन्ही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेत ४५ विद्यार्थ्यांनी तर रांगोळी स्पर्धेत १४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदिका कापडे,द्वितीय आराध्या ताठे तर तृतीय क्रमांक पूजा ताठे हीने पटकाविला. चित्रकला स्पर्धेतील इयत्ता चौथी व पाचवी वर्गाच्या गटात प्रथम क्रमांक आराध्य घुगे,द्वितीय शिवराज गणपुरे तर तृतीय सुकन्या गायकवाड यांनी मिळविला.तर इयत्ता सहावी ते आठवीच्या दुसऱ्या गटात देवयानी ताठे हीने प्रथम, वैभव जाधव यांनी द्वितीय तर स्वराली ताठे हिने तृतीय क्रमांक मिळविला.या दोन्ही स्पर्धांचे परीक्षण डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.सुनिता राठोड,ज्येष्ठ अधिव्याख्याता सुजाता भालेराव,साधन व्यक्ती भारती अंकुशकर आणि प्रकाश वाघमारे यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा जयस्वाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन उज्वलकुमार म्हस्के यांच्यासह अतुलकुमार वेळे,नितीन शेळके,स्वप्निल पाटील यांनी सुयोग्यपणे केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात येऊन सर्व सहभागींना प्रोत्साहन देण्यात आले. ......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com