

Paithan Car Accident
sakal
पैठण : तालुक्यातील चांगतपुरी शिवारात उजव्या कालव्यात कार कोसळून बेपत्ता झालेले पती-पत्नी आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेला तरुण, अशा तिघांचेही मृतदेह अखेर सापडले. सोमवारी (ता. २३) रात्री घडलेल्या या दुर्घटनेतील शेवटचा मृतदेह बुधवारी (ता. २५) रात्री उशिरा हाती लागला.