Farming Success:अवघ्या दहा गुंठ्यांत साठ हजारांची कमाई ;टाकळी पैठण येथे दीड महिन्यात घेतले विविध भाज्यांचे उत्पादन

Small Scale Vegetable Farming : पैठण तालुक्यातील ज्येष्ठ शेतकऱ्याने अवघ्या दहा गुंठ्यांत विविध भाजीपाल्याची लागवड करत दीड महिन्यात ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.
Senior Farmer Ashok Gore Showcases His Thriving Vegetable Farm Spread Across Ten Gunthas in Takli Paithan

Senior Farmer Ashok Gore Showcases His Thriving Vegetable Farm Spread Across Ten Gunthas in Takli Paithan

esakal

Updated on: 

पैठण : वयाच्या सत्तरीतही कष्टाची तयारी, शेतीची आवड आणि आधुनिक नियोजनाची जोड मिळाली तर अल्प क्षेत्रातही समृद्धी साधता येते, हे तालुक्यातील टाकळी पैठण येथील ज्येष्ठ शेतकरी अशोक गोरे यांनी सिद्ध केले आहे. अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात पाण्याचे नियोजन करून त्यांनी विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली असून, अवघ्या दीड महिन्यात ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

Loading content, please wait...