

Administration deploys 15 flying squads to prevent illegal water extraction from Nathsagar and other water projects in Paithan
esakal
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यातील जलसाठे सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. नाथसागर जलाशयासह तालुक्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी १५ प्रकल्पस्तरीय फिरती पथके स्थापन करण्यात आली आहेत.