Paithan Election : इच्छुकांना लागले नगरपालिका निवडणुकीचे वेध; तयारीसाठी अनेकांनी केली रंगीत तालीम, तीन वर्षांपासून प्रशासक राज
Maharashtra Politics : पैठण नगरपालिकेची मुदत २०२२ मध्ये संपल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी निवडणुकीची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे इच्छुकांची तयारी व रंगीत तालीम सुरू झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
पैठण : येथील नगरपालिकेची मुदत जानेवारी २०२२ मध्ये संपुष्टात आल्यापासून आजतागायत प्रशासकीय कारभार सुरू आहे. न्यायालयाच्या सर्वोच्च आदेशामुळे पैठणकरांना आता नगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत.