पैठण: निधी मिळेना

पैठण: निधी मिळेना
Published on: 
पैठण पालिकेच्या तिजोरीत खडखडाट - निवडणुकीच्या नऊ महिन्यांनंतरही नगरसेवकांना निधी मिळेना पैठण, ता. २६ (बातमीदार) : प्रभागातील तातडीच्या व नागरी सुविधांच्या विकासकामांसाठी नगरसेवकांना दरवर्षी निधी मंजूर केला जातो. मात्र, येथील नगर परिषदेत निवडून आलेल्या २६ नगरसेवकांना गेल्या नऊ महिन्यांत छदामही मिळालेला नाही. जानेवारीमध्ये कारभार हाती घेऊन नऊ महिने उलटले, तरी प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने नगरसेवकांची अडचण झाली आहे. परिणामी, शहराच्या मूलभूत विकासकामांना खीळ बसली असून नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. माजी नगराध्यक्षांच्या कार्यकाळात शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला होता. मात्र, सध्या शिवसेनेची सत्ता असलेल्या नगर परिषदेतील सत्ताधारी नगरसेवकांचीच कोंडी झाली आहे. स्थानिक पातळीवर कामे करण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने प्रभागांतील नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे, नगर परिषदेच्या स्वतःच्या तिजोरीतही खडखडाट असल्याने विकासकामांसाठी निधी उपलब्ध करायचा कुठून, असा पेच निर्माण झाला आहे. जानेवारी महिन्यात निकाल लागल्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी पदांची सूत्रे हाती घेतली. कारभार सुरू होताच छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासकीय कामकाज व विकासकामांच्या निविदा प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्या. त्यामुळे निधी वितरणाचा तिढा अधिकच वाढला आहे. - प्रतिक्रिया नगर परिषदेच्या लेखा विभागाकडून या आर्थिक वर्षात प्रभाग विकासासाठी अद्याप कोणालाही निधी वितरित करण्यात आलेला नाही. शासनाकडूनही नगर परिषदेला आवश्यक निधी प्राप्त झालेला नाही. वरिष्ठ पातळीवरून निधी उपलब्ध होताच नगरसेवकांना विकासकामांसाठी त्याचे वाटप केले जाईल. - डॉ. पल्लवी अंभोरे, मुख्याधिकारी, नगर परिषद, पैठण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com