पैठण सार्वजनिक विहिरींचा वापर कचऱ्यासाठी!

पैठण तालुक्यातील स्थिती : आडांचेही पुनरुज्जीवन करणे गरजेचे
Paithan public wells Used for garbage need to revive
Paithan public wells Used for garbage need to revive sakal

पैठण : तालुक्यातील प्रत्येक सार्वजनिक विहिरी आणि आड मोडकळीस आले असून नागरिक त्या आड व विहिरींचा वापर कचरा टाकण्यासाठी करीत आहेत. भूजलपातळी खालावत असताना आड व विहिरींचे पुनरुज्जीवन करून त्यांचा रेन व रूफ वॉटर हार्वेस्टिंग अंतर्गत पुनर्भरणासाठी केल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, अशी माहिती भूजल तज्ज्ञांनी दिली.

तालुक्यात एकूण १११ ग्रामपंचायती आहेत. या सर्व गावांना नळ योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जात असुन नळाद्वारे नियमित पाणी येत असल्याने प्रत्येकाने त्यांच्या गावातील सार्वजनिक विहिरी व आड या पारंपरिक जलस्रोतांकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले आहे .यामुळे नागरिकांनी त्याच विहिरी व आडाचा वापर कचरा टाकण्यासाठी करायला सुरुवात केली आहे. असल्याची. पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात एकूण दोनशेहुन अधिक सार्वजनिक विहिरी असल्याची शासन दप्तरी नोंद आहे. तर त्यासोबत आडही आहेत.

यातील जवळपास ४० टक्के विहिरी व आड बुजविण्यात आले असून , उर्वरित विहिर व आडाचा वापर खुले आम कचरा साठवण्यासाठी केला जात आहे. गावांच्या मालकीच्या असलेल्या या सार्वजनिक आड व विहिरींचे पुनरुज्जीवन जिल्हा परिषद प्रशासनाने करावे, अशी मागणी ही नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. एका विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी तीन लाख रुपयांचा खर्च ग्राह्य धरल्यास प्रशासनाला सर्व विहिरी आडांच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च करावा लागणार आहे . पुनरुज्जीवनानंतर त्या विहिरीचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी लाभाचा ठरणार आहे.

शासनाने या विहिरींच्या पुनर्भरणासाठी मार्गदर्शन ग्रामपंचायत स्तरावर मार्गदर्शन करावे. तसेच पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत गावांमधील सार्वजनिक आड व विहिरींच्या खोलीकरण व मजबुतीकरणासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.

-मीना किशोर वैद्य , सरपंच, नांदर ता. पैठण.

या विहिरी व आडांचा वापर पुनर्भरण करून भूजल पातळी वाढविण्यासाठी करता येऊ शकतो . त्यासाठी त्यांची साफसफाई व खोलीकरण करणे आवश्यक आहे . यासाठी लागणारा निधी शासनाने विशेष फंडातून निधी उपलब्ध करून द्यावा.

-किर्ती शेखर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, सायगाव ता. पैठण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com