Pending Funds: पोषण आहाराची घडी विस्कटली;पाच महिन्यांपासून निधी ठप्प; ३३१ शाळांमधील यंत्रणा संकटात

Paithan School Nutrition Scheme, Pending Funds, Teacher Financial Burden : पैठण तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेतील भाजीपाला, इंधन आणि अतिरिक्त पोषण आहाराचे अनुदान पाच महिन्यांपासून थकीत आहे.
Headmasters in Paithan taluka face financial difficulties as funds for the school nutrition scheme remain pending for five months.

Headmasters in Paithan taluka face financial difficulties as funds for the school nutrition scheme remain pending for five months.

esakal

Updated on: 

पैठण, : विद्यार्थ्यांना शाळेत नियमित पौष्टिक आहार मिळावा, पटसंख्या वाढावी आणि बालकुपोषणाला आळा बसावा, या हेतूने सुरू केलेल्या शालेय पोषण आहार योजनेची पैठण तालुक्यात पुरती दैना झाली आहे. गत पाच महिन्यांपासून भाजीपाला, इंधन तसेच अतिरिक्त पोषण आहाराचे मानधन संबंधित शाळांना मिळाले नसल्याने मुख्याध्यापकांसमोर प्रचंड आर्थिक पेच निर्माण झाला आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी शिक्षकांना उधारी आणि पदरमोड करावी लागत असून, तालुक्यातील शालेय पोषण आहाराची आर्थिक घडीच विस्कटल्याचे चित्र दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com