पैठण ते लडाख सोलो ट्रीप Via बुलेट! 23 दिवस अन् 6400 किमीचा थरारक प्रवास | Paithan to Ladakh

अनेक आव्हानांचा सामना करत अनिल देशमुख या शिक्षकाने या प्रवासात असंख्य ठिकाणांना भेटी दिल्या आहेत.
Paithan To ladakh Solo Trip
Paithan To ladakh Solo TripSakal

पैठण : तिसरा ध्रुव मानले जाणाऱ्या, जगातील सर्वांधिक उंचीच्या लेह लडाख प्रदेशाला गवसणी घालणारा सोलो बुलेट प्रवास पैठण येथील अनिल देशमुख या शिक्षकाने नुकताच पूर्ण केला. सोलो पद्धतीने (एकट्याने) बुलेट मोटारसायकलवर ६ हजार ४३२ कि. मी अंतर २३ दिवसांत पार केले.

या साहसी प्रवासात श्री. देशमुख यांनी अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. त्यामध्ये जगातला सर्वात उंचावरील मोटारेबल रोड उमिंगला, खरडुगला पास, जगातील सर्वात उंचीवरील सैन्यतळ सियाचिन बेस कॅम्प, पाकिस्तानचे सीमेपलीकडील बंकर फक्त २०० मीटरवर आहेत ते भारतीय हद्दीतील शेवटचे खेडे थांग, सत्तर टक्केचीन व तीस टक्के भारतीय हद्दीत असलेले जगात सर्वात उंचावरचे खाऱ्या पाण्याचे सरोवर पॅंगोग लेक अशा ठिकाणांना भेट दिली.

Paithan To ladakh Solo Trip
"सिंगल आहेस कामावर ये" बॉसने सुट्टीच्या दिवशी बोलवलं; कर्मचारी म्हणाला, नोटिस पिरेड सुरू झाला | Chat Viral

त्याचबरोबर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर असलेल्या द्रास शहरातील कारगिल युद्धस्मारक, कारगिल युद्धक्षेत्रातील टोलोलिंग पहाड, बत्रा पॉईंट, टायगर हिल सह १९६२ चीनच्या युद्धभूमीतील चुशूल परिसर, अक्सई चीन, १९४८ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात गमावल्यानंतर जिगरीने जिंकलेले युद्धक्षेत्र, परमवीर चक्र विजेत्या शैतानसिंग यांनी चमत्कार घडविलेली विरभूमी तारा पॉइंट, इंडो तिबेट सह चीन आणि पाकिस्तानचे सिमाक्षेत्र, जगातील सर्वात उंचावर असलेली हेनले येथील विश्वविख्यात लाईट ऑबझरव्हेटरी, पर्यायी शिक्षणाचे केंद्र असलेले सुप्रसिद्ध सासमोल स्कुल, जगात सर्वाधिक उंचीवर असलेले मिलिटरी गुडविल स्कुल, सैन्य संग्रहालये आदी अनेक ठिकाणाला भेट दिली.

बर्फ वृष्टी, विरळ ऑक्सिजन, सतत बदलणारे हवामान, निर्जन रस्ते, अतिविरळ लोकवस्ती, लडाखच्या दूरक्षेत्रातील प्रतिकूल पर्यावरण, पाण्याचे बदलते वेगवान प्रवाह, वेगाचे वारे, बर्फळ रस्ते, वाळवंट, नद्यातील रस्ते, मोजके पेट्रोल पंप आदी अनेक आव्हानांचा सामना करत, वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी ही सोलो बुलेट राईड पूर्ण केली. या प्रवासात त्यांनी मध्यप्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर ही सात राज्य, चंदीगड, लडाख हे दोन केंद्र शासित प्रदेश आणि दिल्ली, चंदीगड, लेह, जयपुर, श्रीनगर, जम्मू, कारगिल या सहा राजधानीच्या रस्त्याने मार्गक्रमण केले.

Paithan To ladakh Solo Trip
''मला आलेल्या ऑफरकडे सीरियसली बघितलं नाही, परंतु बघणार नाही, असं नाही'' पंकजांच्या विधानाने खळबळ

लडाखचा धाडसी प्रवास करणारे देशमुख हे मुळ पैठणकर!

सुमारे अठराशे फूट या पैठणच्या समुद्रसपाटीवरील उंचीपासून एकोणावीस हजार फुटापर्यंतची उंची या राईडमध्ये अनिल देशमुख यांनी गाठली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे श्री. देशमुख पाहिलेच शिक्षक असून एकमेव पैठणकर नागरिक आहे. या प्रशंसनीय कामगिरी बद्दल मानसी पतसंस्था, आयकॉन स्कुल आणि विरंगुळा परिवारातर्फे अनिल देशमुख यांचा देवेश इनामदार, प्रा. संतोष तांबे, प्रा. संतोष गव्हाणे यांनी गौरव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com