
नानासाहेब जंजाळे
शेंदूरवादा, (जि. छत्रपती संभाजीनगर) : आषाढी वारी निमित्ताने अनेक पालख्या, दिंड्या पंढरपूरच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे. त्यात हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. पालखी-दिंडी सोहळ्याने महाराष्ट्रात भक्तिपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरहून लंडनला गेलेल्या आणि तेथे जल्लोषात स्वागत झालेल्या वारीची समाज माध्यमांवर जोरात चर्चा सुरू आहे.