

Rescue workers and villagers at the site of the well collapse accident in Ambe village, Pandharpur
esakal
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीचा कठडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आंबे येथील शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतात नवीन विहीर खोदायचे काम सुरू होते. या कामात मजूर विहिरीत उतरून काम करत असताना अचानक विहिरीचा कठडा कोसळला. त्यामुळे विहिरीत काम करणारे चार मजूर ढिगाऱ्याखाली अडकले.