पं. विश्वनाथ दाशरथे यांच्या गायनाने भाविक मंत्रमुग्ध

पं. विश्वनाथ दाशरथे यांच्या गायनाने भाविक मंत्रमुग्ध
Published on: 
पंडित विश्वनाथ दाशरथेंच्या भक्तिगीताने भाविक मंत्रमुग्ध (Word Count : 229 CC : 16.96 Page Baskets: AbdCityTDYPan8 Locations: -) ABD26J81592 छत्रपती संभाजीनगर ः विष्णुदासांची माउली कार्यक्रमात भक्तिगीतांचे सादरीकरण करताना पंडित विश्वनाथ दाशरथे, साथसंगत करताना सहकलाकार. ----- पं. विश्वनाथ दाशरथे यांच्या गायनाने भाविक मंत्रमुग्ध ----- छत्रपती संभाजीनगर, ता. १७ ः नवरात्र महोत्सवानिमित्त सिडको एन-९ येथील रेणुकामाता मंदिरात ‘विष्णुदासांची माउली’ या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात पंडित विश्वनाथ दाशरथे यांच्या गायनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाची सुरवात संत कवी विष्णुदास यांच्या श्लोकाने आणि देवीच्या गजराने झाली. यानंतर पंडित दाशरथे यांनी एकापेक्षा एक सुंदर आणि सुश्राव्य भक्तिगीते सादर केली. ‘प्रथम तुला वंदितो, कृपाळा’, ‘रुणुझुणु रुणुझुणु नाचत ये जगदंबा’, ‘जय शारदे वागीश्वरी’, ‘अवघे गरजे पंढरपूर’, ‘माझी लाज तुला जगदंबे’, ‘घोंगडीवाला कांबळीवाला’ (गवळण), ‘देवा तुझा मी सोनार’, ‘वृंदावनी वेणू’ (गवळण), ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’, ‘घ्या मुकुंद घ्या मुरारी’ (गवळण), ‘अबीर गुलाल’ या त्यांच्या गीतांनी उत्तरोत्तर रंगत आली. ‘करटाळी बोला मुखे हरिनाम’हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. ‘मन लागले लागले’ या गीतानंतर ‘अवधूत ऐसा रूप तुम्हारा’ या भैरवीने या भक्तिगीत संध्येची सांगता झाली. त्यानंतर संत तुकाराम महाराजांनी रचित ‘हेचि दान देगा देवा’ ही रचना कलाकारांसह भाविकांनी गायली. या कार्यक्रमातील विशेष आकर्षण शाल्मली दाशरथे हिने गायलेले ‘आई भवानी तुझ्या कृपेने’ या गीताला भाविकांनी टाळ्यांनी दाद दिली. तबल्यावर धनंजय जळगावकर, हार्मोनियमवर शांतिभूषण देशपांडे, पखवाजवर गोपाल खोमणे यांनी, तर सहतालवाद्यावर साथ करतानाच अविनाश थिगळे यांनी निरूपणातून जगदंबेच्या देशातील आठ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा अध्यात्मिक वारसा श्रोत्यांसमोर मांडला. तानपुऱ्यावर आदित्य वाघमोडे, निशांत चारठाणकर, श्रीरंग रत्नपारखी यांनी उत्तम साथ दिली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक व रेणुकामाता मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com