एक किलो गांजासह ऑटो जप्त

एक किलो गांजासह ऑटो जप्त
Published on
एक किलो गांजासह ऑटो जप्त परभणीत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १४ ः शहरातील खंडोबा बाजार कॉर्नर परिसरात अवैधरीत्या गांजाची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (ता. १४) धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी १.१० किलो गांजा व गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ऑटो रिक्षा असा एकूण १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परभणी शहरातील खंडोबा बाजार कॉर्नर परिसरात गांजाची अवैधरीत्या वाहतूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने परिसरात सापळा रचून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. दरम्यान, संशयितांकडून गांजाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या कारवाईत १.१० किलो गांजा व बॅग, अंदाजे ५० हजार ५०० रुपये, तसेच एका ऑटो रिक्षा, अंदाजे ७५ हजार रुपये, असा एकूण १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नविद नवाब पठाण (वय २२, रा. निजामाबाद, तेलंगणा), सुलतान मिर्झा (वय ४०, रा. निजामाबाद, तेलंगणा) आणि शेख शिराज शेख खाजा (ऑटो चालक) यांचा संशयित आरोपी म्हणून समावेश आहे. गांजाचा मूळ स्रोत, पुरवठादार, वाहतुकीचा मार्ग तसेच या तस्करीमागील संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक चंदन परिहार, पोलिस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, सहायक पोलिस उपनिरीक्षक नीलेश भुजबळ, पोलिस हवालदार रणजित आगळे, सूर्यकांत फड, लटपटे, माणिक डुकरे, महेश पांगरकर, गिते, कागणे, प्रमोद पुरी आदींचा सहभाग होता. या कारवाईमुळे परभणी शहरातील अमली पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com