
छत्रपती संभाजीनगर : परभणी येथील घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या संदर्भात बुधवारी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. विभागीय आयुक्तांना कार्याध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे इब्राहिम पठाण, मोईन इनामदार, अनिस पटेल, आकेप रजवी, संजय धर्मरक्षक, रेखा राऊत, उत्तम दणके, रेखा मुळे, रंजना कांबळे, संजय जाधव, मीनाज पटेल, रियाज पटेल आदींची उपस्थिती होती.