पहिल्या टप्प्यात २५ हजार जलतारा शोषखड्डे उभारणार

पहिल्या टप्प्यात २५ हजार जलतारा शोषखड्डे उभारणार
Published on: 
लीड बातमी, जलतारा शोषखड्ड्याचा प्रतीकात्मक फोटो असेल तर एक कॉलम वापरा.... परभणीत २५ हजार जलतारा शोषखड्डे उभारणार ३० नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १७ ः संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यात जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांना गती देण्यात येणार आहे. जिल्ह्याला एक लाख जलतारा शोषखड्डे निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात २५ हजार शोषखड्डे तयार करण्याचे नियोजन आहे. ही कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. यासोबतच प्रशासनस्तरावर या कामांचा नियमित आढावाही घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पीक परिस्थिती, चारा उपलब्धता, पाणीटंचाई, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि रोजगार उपलब्धतेचा आढावा घेण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत जलतारा प्रकल्पाबाबत नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे चार हजार शोषखड्डे तयार झाले आहेत. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक गटविकास अधिकाऱ्याने किमान २५ शोषखड्ड्यांच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. अधिकाऱ्यांनी स्वतःच्या निवासस्थानी आणि कार्यालय परिसरात शोषखड्डे तयार करून नागरिकांसमोर आदर्श ठेवावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी साठवण व भूजल पुनर्भरण वाढवावे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करावा. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची तयारी ठेवावी. तसेच नागरिक आणि जनावरांसाठी पाण्याचे स्वतंत्र नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहिमेलाही प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यातील आठ नगर परिषदांमध्ये कचरा संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाटीची व्यवस्था सक्षम करावी. परभणी शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक दहा एकर जागेचा प्रश्न मार्गी लावावा. रात्रीच्या वेळीही कचरा संकलन करावे. जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टी व नळपट्टी वसुली वाढवून स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करावा. शाळा, अंगणवाडी आणि रुग्णालयांमध्ये स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता प्रत्यक्ष तपासावी. अनधिकृत नळजोडण्या बंद करणे, पाणी बचत, चारा नियोजन आणि अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. --- अनधिकृत नळजोडण्या बंद होणार परभणी शहरातील अनधिकृत नळजोडण्या पुढील १५ दिवसांत बंद कराव्यात. ज्या नागरिकांना नळजोडण्या नियमित करून घ्यायच्या आहेत, त्यांच्याकडून आवश्यक नळपट्टी भरून घेऊन नियमानुसार नियमितीकरण करावे. पाणी बचतीसाठी नागरिकांमध्ये जलसाक्षरता निर्माण करण्याबरोबरच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महानगरपालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून सर्व नगर परिषदांनी आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. --------- पाणी उपलब्धतेचा आढावा जिंतूर शहराला तीन दिवसांआड, तर पाथरी आणि सोनपेठ येथे सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सोनपेठमधील काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सेलू शहरासाठी पुढील पाच महिन्यांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. गंगाखेड, मानवत आणि पालम शहरांच्या पाणीपुरवठा स्रोतांचाही आढावा घेण्यात आला. --- चारा लागवड योजनेचा प्रसार होणार संभाव्य दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गावपातळीवर चारा लागवड योजनेची पशुपालकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. वैरण विकास योजनेच्या माध्यमातून चारा आणि बियाण्यांचे वितरण करण्यात येईल. तसेच उपलब्ध योजनांचा लाभ अधिकाधिक पशुपालकांपर्यंत पोहोचवून भविष्यातील चारा टंचाई टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.