ST Journey : प्रवाशांनो, प्रवास करताना सांभाळा! बसमध्ये जागेसाठी बॅग नव्हे, रुमाल टाका!

दिवाळीनिमित्त सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला प्रचंड गर्दी होत आहे. मात्र याच गर्दीचा फायदा घेत पाकिटमार आणि बॅगा पळवणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
ST bus
ST bussakal

छत्रपती संभाजीनगर - दिवाळीनिमित्त सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला प्रचंड गर्दी होत आहे. मात्र याच गर्दीचा फायदा घेत पाकिटमार आणि बॅगा पळवणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. म्हणूनच बसने प्रवास करताना खबरदारी घेण्याची गरज आहे.

असे आहेत चोरीचे प्रकार

प्लॅटफार्मवर बस आल्यानंतर प्रवासी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करतात. अनेकजण बसच्या खिडकीतून जागा पकडण्यासाठी बॅग सीटवर टाकतात. नंतर बसमध्ये येण्यासाठी दरवाजाजवळून आत घुसण्याचा प्रयत्न करतात. गर्दी खूप असल्याने आत येईपर्यंत बराच वेळ जातो.

त्याचवेळी सक्रीय चोरट्यापैकी बसमध्ये घुसलेला चोरटा अशा प्रवाशांची बॅग खिडकीतून आपल्या खाली असलेल्या सहकाऱ्याकडे देतो. खाली असलेला चोरटा बॅग घेऊन पसार होतो. दुसऱ्या प्रकारात गर्दीतून बसमध्ये प्रवेश करतांना खिशातील पाकीट पळवले जाते. अनेक चोरटे ब्लेडने खिसा कापून, तर काही जण खिशातील पाकीट अलगद बाहेर काढून घेतात.

तिसऱ्या प्रकारात बसस्थानकात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांचे लक्ष विचलीत करुन बॅग पळवल्या जातात. काही वेळा तर प्रवास करताना बॅग पळवल्या जाते. प्रवाशांनी बसच्या रॅकमध्ये बॅग ठेवलेल्या असतात चोरट्यांचे प्रत्येक बॅगवर लक्ष असते. प्रवाशी झोपला किंवा गप्पामध्ये दंग झालेल्या प्रवाशांची बॅग घेऊन आलेल्या थांब्यावर उतरुन जातात. प्रवास संपल्यानंतर बॅग चोरी लक्षात येते.

चोरी झालीच तर हे करा

प्रवासासाठी निघाल्यानंतर पाकीट अथवा बॅग चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर लगेच तक्रार करा. बसस्थानकात असाल तर पोलिस चौकीत किंवा वाहतूक नियंत्रकांकडे तक्रार करा. प्रवासादरम्यान असाल तर कंडक्टरला सांगून पुढच्या बसस्थानकावर एसटीकडे आणि पोलिसांकडेही थेट तक्रार करा.

अशी घ्या काळजी

- बसमध्ये जागा पकडण्यासाठी बॅग टाकताना सीटवर जाईपर्यंत बॅग नजरेत ठेवा.

कुणीतरी बॅगवर लक्ष ठेवेल, अशा व्यक्तीची मदत घ्या.

- गर्दीतून बसमध्ये प्रवेश करताना खिशातील पाकीट, गळ्यातील दागिने यावर लक्ष ठेवा.

- बसच्या प्रतीक्षेत असाल तर बॅग दुर्लक्षीत होऊ देवू नका.

- संपूर्ण प्रवासात बॅगवर लक्ष असू द्या, झोप लागणार असेल तर सोबत असलेल्यांना सांगून ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com