Chhatrapati Sambhajinagar : ‘पोर्टल’मधून निवडलेल्या शिक्षकांना ‘गुड न्यूज’

शिक्षक विभागातर्फे ‘पवित्र’ संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.
pavitra portal teacher recruitment get job after lok sabha election
pavitra portal teacher recruitment get job after lok sabha electionSakal

छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगाने विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक स्थगित केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांनी शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्त्या देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवड होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

शिक्षक विभागातर्फे ‘पवित्र’ संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने ५७१ मराठीच्या जागांसाठी, तर ९२ उर्दूच्या जागांसाठी जाहिरात दिली होती.

त्यापैकी ३७० मराठीसाठी आणि उर्दूसाठी ३८ जणांची अंतिम निवड करण्यात आली होती. मात्र, कागदपत्रे पडताळणीासाठी मराठीचे १०, तर उर्दूचे ५ उमेदवार गैरहजर राहिले होते. कागदपत्र पडताळणीनंतर आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेने मराठीच्या २०० तर उर्दूच्या ३१ अशा एकूण २३२ उमेदवारांना पदस्थापना दिली होती.

दुसऱ्या टप्प्यात माध्यमिकच्या उमेदवारांना पदस्थापना द्यायची होती, मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीमुळे थांबली होती. शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेच्या पुढील कार्यवाहीबाबत निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिला होता.

त्यानुसार आयोगाने निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांत शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार आता शिक्षक भरती प्रतीक्षेत असलेले १५४ मराठीचे,

तर एक उर्दू माध्यम असे १५५ जणांना लवकरच पदस्थाना दिली जाणार आहे. शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भातील सविस्तर आढावा शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे, असे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, नवीन शिक्षकांना पदस्थापनेअगोदर विनंती बदली प्रक्रिया राबविण्यात यावी, असे शिक्षण विभागाचे आदेश होते. त्यामुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्याआगोदर विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांचा विचार केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हजाराहून अधिक शिक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com