

छत्रपती संभाजीनगर : थकीत मालमत्ता कराच्या रकमेपैकी ४८ लाख ३६ हजार रुपये १५ दिवसांत जमा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी बुधवारी भगवान शिक्षण प्रसारक मंडळास दिला. वरील निर्धारीत वेळेत ही रक्कम जमा न केल्यास मनपाला कारवाईची मुभा राहील, असे मनपाचे वकील संभाजी टोपे यांनी सांगितले.