Aurangabad Corona Update : दंड भरू पण...लस न घेताच फिरू! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona
औरंगाबाद : दंड भरू पण...लस न घेताच फिरू!

औरंगाबाद : दंड भरू पण...लस न घेताच फिरू!

औरंगाबाद : शहरात गेल्या काही दिवसात कोरोना (Corona)संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घ्या, (Vaccine)अन्यथा दंड वसूल केला जाईल, असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. तथापि, दंड भरू पण लस न घेता फिरू, असाच आविर्भाव सध्या नागरिकांचा आहे. महापालिकेने कोरोना प्रतिबंधाची लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या एक हजार २६२ नागरिकांकडून तब्बल सहा लाख ३१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हेही वाचा: तुळजापुरात भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पाहा व्हिडिओ

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लसीकरणाला गती देण्यासाठी प्रशासनाचे काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. पण अनेक जण अद्याप लस घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. ज्या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, तिथे जनजागृती केली जात आहे. त्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र त्यालाही नागरिक जुमानत नसल्याने ज्या नागरिकाने लसीचा एकही डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांना रस्त्यावर अडवून पाचशे रुपयांचा दंड करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

हेही वाचा: Aurangabad : सोयगाव नगरपंचायतीसाठी आज निवडणूक, मतदानाचा टक्का वाढला

महापालिका क्षेत्रात प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा व उपायुक्त सौरभ जोशी यांनी नागरिक मित्र पथकांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातील नागरिकांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम सुरु केले आहे. १६ डिसेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२ या एक महिन्याच्या काळात पंधरा नागरिक मित्र पथकांच्या माध्यमातून ७५ हजार ५० नागरिकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासण्यात आले.

त्यात एक हजार २६२ नागरिकांनी अद्याप लस घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. या नागरिकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारून सहा लाख ३१ हजार रुपये वसुल करण्यात आले. तसेच त्यांना लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन करण्यात आले. लस न घेतलेल्या नागरिकांना दंड करण्याची कारवाई सुरुच राहील असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.(Aurangabad News)

Web Title: Pay The Fine But Walk Around Without Vaccinated

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top