प्रलंबित कामांना गती द्या

प्रलंबित कामांना गती द्या
Published on: 
प्रलंबित कामांना गती द्या सीईओ प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या सूचना धाराशिव, ता. ७ (बातमीदार) : जिल्हा परिषदेअंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्हा परिषदेच्या मालमत्तांची माहिती संकलित करून त्यांची नोंद जिल्हा परिषदेच्या नावावर आहे का, याची तपासणी करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी केल्या. जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुखांची विभागनिहाय आढावा बैठक म्हाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी विविध योजना, उपक्रम, प्रलंबित कामे, नागरिकाभिमुख उपक्रम आणि आगामी नियोजनाचा आढावा घेण्यात आला. सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुक्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवरही चर्चा झाली. ‘सात ते नऊ- मोबाईल-टीव्ही बंद, अभ्यास सुरू’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. टंचाईच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या पाइपलाइन, गाळ काढणे, जलस्रोतांची उपलब्धता वाढविणे आणि पाणीपुरवठा उपाययोजनांचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्या, पशुवैद्यकीय दवाखाने, गावठाण जमिनी आदी मालमत्तांची अभिलेखांनुसार पडताळणी करून स्वतंत्र नोंद ठेवण्यास सांगण्यात आले. ग्रामसभा, पंधरावा वित्त आयोगाचा निधी, मनरेगा कामे आणि रोजगारनिर्मितीच्या कामांनाही गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या. ‘एक दिवस-एक ग्रामपंचायत तपासणी’ उपक्रमांतर्गत ग्रामविकास अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन अभिलेख अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले. शाळांची स्वच्छता आठवड्यातून किमान तीन दिवस करण्यासही सांगण्यात आले. प्रलंबित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत. अनावश्यक विलंब अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा म्हाडदळकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com