​तात्यारावजी मोरे फार्मसी महाविद्यालयात स्पर्धात्मक परिक्षेचे मार्गदर्शन

​तात्यारावजी मोरे फार्मसी महाविद्यालयात स्पर्धात्मक परिक्षेचे मार्गदर्शन
Published on: 
उमरगा येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर ​उमरगा, ता. २३ : शहरातील तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात फार्मसी क्षेत्रातील स्पर्धात्मक परीक्षा, जी-पॅट परीक्षा तसेच विविध शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीसंदर्भात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ​महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कवलजीत बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी लातूर येथील जी-पॅट ऑफलाइन डिस्कशन सेंटरचे विभागप्रमुख रुपेश चौरे यांनी फार्मसी क्षेत्रातील स्पर्धात्मक परीक्षांचे आणि जी-पॅट परीक्षेचे महत्त्व विशद केले. तसेच परीक्षेची तयारी करण्याची योग्य पद्धत, अभ्यासाचे नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन यावर सविस्तर प्रकाश टाकला. शिष्यवृत्ती परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध संधी व आर्थिक लाभांची माहिती देत, विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन, नियमित अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. ​या  कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत माने, डॉ. गणेश केशवशेट्टी, प्रा. सूरज मोरे, प्रा. विष्णू पाटील, प्रा. धृती माने, प्रा. दीपाली भगत, प्रा. वैष्णवी जाधव, प्रा. अंकिता यादव व प्रा. सगुना म्हेत्रे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते समन्वय प्रा. लक्ष्मण निंबाळे यांनी सूत्रसंचलन यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com