
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी अंतिम गुणवत्ता यादी १६ एप्रिल रोजी जाहीर होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप यादी जाहीर न झाल्याने इच्छुक संशोधकांना पीएचडीच्या अंतिम गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागत आहे. आता २५ एप्रिल रोजी यादी जाहीर होईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सोमवारी (ता. २१) सांगण्यात आले.