
छत्रपती संभाजीनगर : कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव खान अस्मा इद्रिस यांची इंग्रजी, तर सहसचिव पठाण मकसूद खान पठाण यांची हिंदी विषयातील पीएचडी नोंदणी रद्द करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधन मान्यता समितीने नोंदणी रद्द केल्याचे पीएचडी विभागाने कळविले आहे.