

Chhatrapati Sambhajinagar
esakal
फुलंब्री: तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या ७१ ग्रामरोजगार सेवकांचे गेल्या १० महिन्यांपासून सुमारे ५० लाख रुपयांचे मानधन शासनाकडे थकीत आहे. यामुळे सेवकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून, कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. शासनाच्या या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी १ एप्रिल रोजी ‘स्वतःला जोडे मारो’ आंदोलन करण्याचा इशारा ग्रामरोजगार सेवक संघटनेने दिला आहे.