

Fuel Shortage
sakal
फुलंब्री : शहरासह परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर गुरुवारी वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही पेट्रोल पंपांवर डिझेलची विक्री तात्पुरती बंद झाल्याने तसेच भविष्यात पेट्रोल टंचाई भासू शकते, अशी चर्चा पसरल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली. परिणामी अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.