Shravan Month: सातमाळा डोंगररांगेतील पिनाकेश्वर (मोठा) महादेव मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यातील कावड यात्रा, जलाभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रमांनी येथे भक्तीचा महापूर असतो.
अजिंठा, सातमाळा डोंगररांगेतील नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यातील लाखो भाविकाचे श्रद्धास्थान असलेले पिनाकेश्वर (मोठा) महादेवाचे प्राचीन मंदीर आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात दररोज व दर सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.