PM Narendra Modi: पैठणी विणत्या हातांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरव! पैठणच्या कविता ढवळेंच्या कार्याचा ‘मन की बातमध्ये उल्लेख
Kavita Dhavale: पैठणच्या कविता ढवळे यांच्या पारंपरिक पैठणी विणकामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात कौतुक केले. त्यांचा हातमागावरील कलेचा प्रवास आता राष्ट्रीय पातळीवर गौरवला जात आहे.
पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) : शासनाच्या येथील ‘मऱ्हाटी पैठणी साडी केंद्रा’तील विणकर कविता ढवळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २७) ‘मन की बात’ या कार्यक्रमात सन्मानपूर्वक उल्लेख केला.