esakal | दहीहंडी फोडणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

दहीहंडी

दहीहंडी फोडणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे टी.व्ही. सेंटर चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह मनसैनिकांना ताब्यात घेतले. यावेळी मनसैनिकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

हेही वाचा: पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार;पाहा व्हिडिओ

राज्य शासनाचे निर्बंध झुगारून मनसेने मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी दहीहंडीचे आयोजन केले होते. जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या नेतृत्वाखाली दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मनसैनिकांना अडवल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. ‘सरकार मनसेसे डरती है, तो पोलीसको आगे करती है’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

जिल्हाध्यक्ष सुहास भाऊ दाशरथे, शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, सचिव संतोष कुटे, विभाग अध्यक्ष चंदू नवपुते, गणेश साळुंके, युवराज गवई, नीरज बरेजा, विशाल विराळे पाटील, रमेश पुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना रात्री सोडून देण्यात आले. यावेळी नामदेव बेंद्रे, दिपक पवार, अविनाश पोफळे, आशिष सुरडकर, सोमु पाटील, सुरज बोकारे, ऋषभ रगडे, किरण गवई, अमोल विधाते, सागर भारती, नागेश मोटे, चिन्मय कुलकर्णी, प्रकाश कसारे,अमर विधाते, शुभम पवार आदींची उपस्थिती होती.

loading image
go to top