Crime News : आरोपीच्या प्रसूत झालेल्या पत्‍नीला पोलिसांनी पोचविले सुखरूप घरी

Police Protection : फसवणुकीच्या गुन्ह्यात पती फरार असताना, पत्नी प्रसुतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होती. संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांना सतर्क करण्यात आले.
Crime News
Crime News Sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : फसवणुकीच्या गुन्ह्यात पती चार महिन्यांपासून अडकलेला असून फरार आहे. त्याची पत्नी प्रसुतीसाठी कोकणवाडी येथील एका हॉस्पीटलमध्ये दाखल होती. काही संशयित व्यक्ती हॉस्पीटलमध्ये चकरा मारत होत्या. महिलेच्या नातेवाईकांनी सांगितल्यानंतर हॉस्पीटल प्रशासनाने वेदांतनगर पोलिसांना हा प्रकार कळवला. या महिलेची प्रसुती झाल्यानंतर नवजात बाळासहीत पोलिसांनी तिची पोलिस बंदोबस्तात सुखरुप बोकूड जळगाव येथे माहेरी रवानगी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com