पोलिस हेडकॉन्स्टेबलचा धक्कादायक शेवट, गळफास घेऊन आत्महत्या

पोलिस हेडकॉन्स्टेबल  प्रभुदास  म्हस्के
पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रभुदास म्हस्के सकाळ
Summary

खुलताबाद येथे राहत असलेले पोलिस हेडकॉन्स्टेबल यांची ऑक्टोबर २०२० मध्ये पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती. तत्पूर्वी ते वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात कर्तव्यास होते.

खुलताबाद(जि.औरंगाबाद) : येथीव पोलिस कॉलनीत राहणारे प्रभुदास सज्ञानराव म्हस्के (वय 53, रा.सिंदखेडराजा, ह.मु.खुलताबाद) यांनी बुधवारी (ता.16) सकाळी आपल्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन Police Man Committed Suicide आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक, मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.याबाबत अधिक माहिती अशी, पोलिस हेडकॉन्स्टेबल Police Head Constable म्हस्के हे कुटुंबासह खुलताबाद येथील पोलिस कॉलनीत वास्तव्यास होते. ते ड्युटीला मात्र औरंगाबाद Aurangabad पोलिस मुख्यालयात होते. दैनंदिन कामकाज आटोपुन ते मंगळवारी (ता.१५) पोलिस कॉलनीतील निवासस्थानी कुटुंबासह झोपी गेले. पहाटे पत्नीने त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आवाज दिले. मात्र आतुन कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने पत्नीने शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा उघडला असता, म्हस्के यांनी गळफास घेतल्याचे आढळले. याबाबतची माहिती खुलताबाद पोलिस ठाण्यात Khultabad Police Station देताच पोलिस उपनिरीक्षक कोमल शिंदे यांनी भेट दिली. घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही. खुलताबाद येथे राहत असलेले पोलिस हेडकॉन्स्टेबल यांची ऑक्टोबर २०२० मध्ये पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती. तत्पूर्वी ते वेरुळ Ellora येथील घृष्णेश्वर मंदिरात Ghrishneshwar Temple कर्तव्यास होते.Police Head Constable Committed Suicide In Khultabad Tahsil

पोलिस हेडकॉन्स्टेबल  प्रभुदास  म्हस्के
Corona : मराठवाड्यात साडेपाचशे जणांना कोरोना, २८ मृत्यू

गेल्या अनेक दिवसांपासुन ते मानसिक तणावाखाली होते. त्यातच त्यांना व्यसनही जडले होते. बुधवारी सकाळी त्यांनी शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणुन घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिंदे या करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com