
बीड : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसह सामाजिक सलोख्यावर परिणाम झाल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले. ही दरी सांधण्यासाठी पोलिस दलाचा ‘आडनाव’ दूर ठेवत केवळ ‘नावा’चा उल्लेख करण्याचा प्रयोग यशस्वी ठरताना दिसत आहे. अगदी पोलिस अधीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्याच टेबलांवरील आणि छातीवरील नेमप्लेटमधून आडनाव दूर झाले आहे.