
छत्रपती संभाजीनगर : दुचाकीवरील चौघांनी पोलिसांच्या वाहनाला अडवून हल्ला केला. यात पोलिस कर्मचारी राहुल चावरिया यांना फायटरने मारहाण करीत जबर जखमी केले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (ता. १६) मध्यरात्री सूतगिरणी चौक परिसरात घडली. या प्रकारानंतर पोलिस कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.