जुगार अड्ड्यावर छापा; चौघे ताब्यात

जुगार अड्ड्यावर छापा; चौघे ताब्यात
Published on: 
जुगार अड्ड्यावर छापा; चौघे ताब्यात नांदेड : घोटी फाटा ते मलकापूर खेरडा रस्त्यावरील शेतात सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर किनवट पोलिसांनी छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोकड, मोबाईल व दोन दुचाकींसह एक लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (ता. २) करण्यात आली. प्रभारी अधिकारी जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. यावेळी अभिजित ऊर्फ राजू राम कराळे (वय ३८, रा. कमठाला), बालाजी गोविंद राठोड (वय ३६, रा. सरदारनगर, किनवट), मारोती पिराजी कदम (वय ३९, रा. घोटी) आणि प्रभाकर गोविंद शिंदे (वय ३५, रा. लक्कडकोड) हे जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी ४७ हजार ६०० रुपये रोख, ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल, ६० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी व जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार व पोलिस अंमलदार आशिष डगवाल, पुरी, डुकरे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com