
शिरूर कासार : बावी (ता. शिरूर कासार) येथील ढाकणे पिता-पुत्रांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात आरोपी असलेला सतीश भोसले ऊर्फ खोक्या अद्याप फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सोमवारी (ता. ११) तालुक्यातील रायमोह शिवारात त्याची आलिशान कार (फोर्ड एंडिव्हर) जप्त केली.