crime sakal
छत्रपती संभाजीनगर
Karmad Crime : शेतामध्ये पिकवला तब्बल एक कोटी रुपयांचा गांजा! करमाड परिसरात गुन्हे शाखेची कारवाई
Karmad Crime : करमाड परिसरात पोलिसांनी शेतात अवैध गांजा पिकवणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई केली. १ कोटी रुपयांची ४९४ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली.`
छत्रपती संभाजीनगर : शेतातील पिकात गांजाची झाडे लावून त्याची जोपासना करणाऱ्या दोघांविरुद्ध करमाड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. १७ नोव्हेंबरला लामकाना येथे ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपींच्या ताब्यातून एक कोटी रुपये किमतीची ४९४ किलोची गांजाची झाडे जप्त करण्यात आली.

