esakal | ‘भाऊ’ला पोलिसांचा हिसका! नेतेगिरीचा आविर्भाव आला अंगलट
sakal

बोलून बातमी शोधा

4Police_3

नेतेगिरीचा आविर्भाव एका स्थानिक नेत्याच्या चांगलाच अंगलट आला. भावासाठी हा ‘भाऊ’ पोलिस उपायुक्तांकडे गेला खरा पण उपायुक्तांनीच त्याला हिसका दाखविला, अशी चर्चा असून तो एका पक्षाचा पदाधिकारीही आहे.

‘भाऊ’ला पोलिसांचा हिसका! नेतेगिरीचा आविर्भाव आला अंगलट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : नेतेगिरीचा आविर्भाव एका स्थानिक नेत्याच्या चांगलाच अंगलट आला. भावासाठी हा ‘भाऊ’ पोलिस उपायुक्तांकडे गेला खरा पण उपायुक्तांनीच त्याला हिसका दाखविला, अशी चर्चा असून तो एका पक्षाचा पदाधिकारीही आहे. त्याला यापूर्वी एका पोलिस आयुक्तांनीही हिसका दाखविला होता. सूत्रांकडून प्राप्त माहितीनूसार, ‘भाऊ’ या नावाने परिचित असलेल्यांचा एक भाऊ २५ डिसेंबरला बहिणीला सोडण्यासाठी कारने सातारा परिसरात गेला होता. तेथून परतताना त्याला एका अन्य कारने हुलकावणी दिली. त्याचा जाब विचारताना दोघांत मारहाण झाली.

यानंतर स्वतःची दोन तोळ्याची सोनसाखळी हिसकावली, अशी तक्रार त्याने पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर त्याला पोलिसांनी चौकशीला बोलाविले होते. तक्रारदार असूनही आपल्या भावाला चौकशीसाठी पोलिसांनी बोलाविले हीच गोष्ट ‘भाऊ’ला आवडली नाही. त्यामुळे या ‘भाऊ’ने थेट पोलिस परिमंडळ-२ येथील पोलिस उपायुक्तांचे कार्यालय गाठले. विशेष म्हणजे तो एकटाच नव्हे तर दहा ते पंधरा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गेला. तेथे त्याने ‘‘तक्रारदाराला चौकशीसाठी का बोलावले; सोनसाखळी हिसकावणाऱ्याला अटक करा’’ असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले. पण हा गोंधळ वाढतच होता. त्यामुळे उपायुक्तांनी त्याचा नेतेगिरीचा आविर्भाव उतरविला. याच ‘भाऊ’वर तीन वर्षांपुर्वीही स्थानबध्दतेच्या कारवाईचे प्रकरणही चर्चेत आले होते.

Edited - Ganesh Pitekar

loading image