
छत्रपती संभाजीनगर : ‘मंत्री संजय शिरसाट यांनी मुलगा सिद्धांत यांच्या नावे मद्यनिर्मिती कारखाना उभारण्यासाठी एमआयडीसीमध्ये भूखंड खरेदी केला. त्यासाठी नियमानुसार ७७ लाख रुपयांचा दंड भरल्याचा दावा केला. मात्र, महिनाभरातच शिरसाट यांनी दंडाची ही रक्कम परत मिळावी यासाठी संबंधित खात्याकडे अर्ज केला’, असा आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मंगळवारी (ता. १५) पत्रकार परिषद घेत केला.