शैक्षणिक मंचावर राजकीय टोलेबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय 
टोलेबाजी

शैक्षणिक मंचावर राजकीय टोलेबाजी

औरंगाबाद - शहरातील सातारा येथील देशातील पहिल्या आयएसओ केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी (ता.१८) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘पहिले पाऊल शाळापूर्व तयारी अभियाना’ला सुरुवात केली. यावेळी आमदार विक्रम काळे यांनी सुरूवातीला भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचे नाव घेण्याअगोदर ‘अच्छे दिन’चे आमदार असा उल्लेख केला. यावेळी व्यासपीठावर चांगलीच राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली. यात विक्रम काळे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.

आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या भाषणात राज्यातील ९५ टक्के शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत, अशी तक्रार शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमोर केली. यावर उत्तर देताना आमदार विक्रम काळे म्हणाले की, राज्यातील शिक्षक हा कुठेही राहत असला तरी शाळा सुरू होण्याअगोदर दहा मिनीटे आणि शाळा संपल्यावर दहा मिनिटानंतरच तो शाळेतून जात असतो. त्यांच्या येण्या-जाण्याचे न पाहता त्यांच्या केलेल्या कार्याची आपण दखल घ्यायला हवी. तसेच प्रशांत बंब यांनी मराठवाड्यातील उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात ड्रॉप आऊट असल्यास असा उल्लेख आपल्या भाषणात केला. याला उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील सरकार हे शैक्षणिक धोरणात बदल आणत असून जगात विद्यार्थी कोठेही गेले तरी ते ड्रॉप आऊट होणार नाही अशी शैक्षणिक पद्धती राज्यात आणत आहोत, असे सांगितले. तसेच आज महागाई किती वाढली आहे मात्र भाजपच्या आमदारांना नाइलाजाने ती सहन करावी लागत आहे असा टोलाही श्री काळे यांनी लगावला.

Web Title: Political Criticize On The Educational Stage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top