esakal | कोरोना काळात औरंगाबादचे राजकारणी इतके बेफिकीर कसे? ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नियम काय जनतेनेच पाळायचे का ?
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Politicisn News

मास्क न घातल्यास शहरवासीयांकडून दंड वसूल केला जात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना अनेकांनी तोंडावरचा मास्क काढला होता. यावर प्रशासन कारवाई करणार की नाही.

कोरोना काळात औरंगाबादचे राजकारणी इतके बेफिकीर कसे? ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नियम काय जनतेनेच पाळायचे का ?

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.२१) जनतेला संबोधित करताना मास्क, सतत हात धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रांचा पुन्हा आठवण करुन देऊन जनतेला ते पाळण्याचे आवाहन केले आहे. लाॅकडाऊन राज्यात करायचे की नाही हे त्यांनी जनतेवर सोपवले आहे. औरंगाबादेत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. यात येथील राजकारणी बेफिकीर असल्याचे दिसत आहेत.

वाचा - स्वप्नं पापण्यातले पापण्यातच विरले, कुटुंबाचा आधार होऊ पाहणाऱ्या जिद्दी प्रतिक्षाला काळाने अडविलेच

आज सोमवारी (ता.२२) औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी राजकारण्यांनी सगळे नियम धाब्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिसले. यात आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार सुभाष झांबड, कन्नडचे आमदार रमेश बोरणारे, काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यासह अनेक राजकारण्यांचा समावेश होता.

वाचा - माणुसकीचं दर्शन! विजेच्या धक्क्याने मृत पावलेल्या माकडाची काढली अंत्ययात्रा

जनतेला एक आणि राजकारण्यांना वेगळी वागणूक?
मास्क न घातल्यास शहरवासीयांकडून दंड वसूल केला जात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना अनेकांना तोंडावरचा मास्क काढला होता. यावर प्रशासन कारवाई करणार की नाही. केवळ जनतेला नियम दाखवायचे आणि राजकारण्यांनी सुसाट सुटायचे हा कसला प्रकार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या कोरोनाबाबतचे आवाहनाला राजकारणी हरताळ फासताना दिसत आहेत.


सर्वसामान्य नागरिकांच्या उत्साहावर निर्बंध लादणारे पोलिस आता लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करतील  का?
- महेश गुजर, मनसे शेतकरी सेना