
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतर्फे बेगमपुरा, प्रतापनगर, सिडको एन-६ आणि मुकुंदवाडी या चार ठिकाणी प्रदूषणमुक्त शवदाहिन्यांची उभारणी केली आहे. या अत्याधुनिक शवदाहिन्यांद्वारे केवळ २५ टक्के इंधनात अंत्यसंस्कार होत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या शवदाहिन्यांसाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.