
छत्रपती संभाजीनगर : वारसास्थळांचे महत्त्व व त्यांच्या संवर्धनाची वाटचाल सोपी करत महाराष्ट्रातील दोन बारवांचे कॅन्सलेशन स्टॅम्प (पोस्टल स्टॅम्प) टपाल विभागाने प्रकाशित केले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील शिवालय तीर्थ (पुष्करणी) जे तीर्थकुंड नावाने ओळखले जाते. तसेच, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील, नैताळे गावातील बारवाचा समावेश आहे.