टपाल कर्मचाऱ्यांचे राज्यभर धरणे आंदोलन

टपाल कर्मचाऱ्यांचे राज्यभर धरणे आंदोलन
Published on: 
टपाल कर्मचाऱ्यांचे आंदोलन १९ व २० नोव्हेंबरला संपाचा इशारा छत्रपती संभाजीनगर, ता. ३१ : पोस्टमन व एमटीएस कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन, पोस्टमन अँड एमटीएस’तर्फे गुरुवारी (ता. ३०) राज्यभरात धरणे आंदोलन केले. यावेळी विविध टपाल कार्यालयांसमोर निदर्शने करून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार आवाज उठविला. तसेच, मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या १९ व २० नोव्हेंबरला राज्यभर संप पुकारण्याचा इशाराही संघटनेने दिला. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र सर्कलचे उपाध्यक्ष देवेंद्र परदेशी व आर.पी. सारंग यांच्या नेतृत्वाखाली आणि बाळकृष्ण चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. पोस्टमन व एमटीएस कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणे, अवास्तव कामाचे उद्दिष्ट बंद करणे, अयोग्य आयडीसी पद्धत रद्द करणे तसेच युनियनला स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देणे, अशा विविध नऊ प्रमुख मागण्या संघटनेने प्रशासनासमोर मांडल्या आहेत. प्रशासनाने तातडीने मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास, १९ व २० नोव्हेंबरला राज्यातील सर्व पोस्ट कर्मचारी संपावर जातील, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनात विभागीय अध्यक्ष शीतल काचोळे, विशाल वेताळ, सय्यद ताज मोहम्मद, याकिन शेख, महादेव इलग, आनंद बोहते, सुनील जैन यांच्यासह अनेक कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.