
छत्रपती संभाजीनगर : वारंवार फुटणारे पाइप व त्यात येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. आठ ते दहा दिवसांनंतर नळाला पाणी मिळत असून, ऐन पावसाळ्यात नागरिकांवर पाणी-पाणी करण्याची वेळ आलेली असताना त्यात आता एमएसईबीने सहा तासांचा शटडाऊन मागितला आहे.