छत्रपती संभाजीनगर : महावितरणने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत गेल्या वर्षात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबवली. यात मोहिमेत ५,९०३ वीज मीटरची तपासणी करण्यात आली..यामध्ये ३,२२१ मीटरमध्ये २ कोटी ७५ लाख ८५ हजार ८६६ युनिट वीज चोरी आढळली. त्याचे बिल २३ कोटी ७८ लाख रुपये होते. या प्रकरणात तडजोडीनंतर १८ कोटी ७७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. १७७ जणांवर गुन्हे नोंद झाले..विद्युत कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो; तसेच कलम १३५ मध्ये मीटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सर्व्हिस वायर टॅप करणे आणि कलम १३८ मध्ये महावितरणचे मीटर, वायरसह इतर वस्तू चोरी करणे आदी बाबींचा समावेश होतो..वीज चोरीची रक्कम (लाख रुपयांमध्ये)वीज चोरी पथक ग्राहक वीज चोरीची रक्कमछत्रपती संभाजीनगर शहर ९०१ ५७१.०९छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ३६० २६७.१५जालना ३८९ २८२.८४ छत्रपती संभाजीनगर परिमंडल १६५० ११२१.०८बीड ८५ ६९.२४धाराशिव २५८ १७६.९७ लातूर ४४९ ३७७.९० लातूर परिमंडल ७९२ ६२४.११नांदेड ४१७ ३००.१३ हिंगोली ६४ ४०.३० परभणी २९८ २८३.९० नांदेड परिमंडल ७७९ ६२४.३३ मराठवाडा एकूण ३२२१ २३७०.२४ .MSMTA Protest : वैद्यकीय महाविद्यालयात गैरवैद्यकीय शिक्षकांचे प्रमाण वाढविण्यास एमएसएमटीएचा विरोध; शॉर्टकट उपाय नको .मराठवाड्यात आगामी काळातही मोठ्या प्रमाणात वीज चोरीची शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वीज चोरी टाळावी, तसेच वेळेवर बिल भरून सहकार्य करावे. - आदित्य जीवने, सहव्यवस्थापकीय संचालक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.