(ABD26J81195)
बीड बायपास ः परिसरातील जाबिंदा मैदानावर ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्याचे स्तंभपूजन करताना संस्थापक अध्यक्ष राजेंद्र साबळे, मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर.
---
‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्याचे स्तंभपूजन
जाबिंदा मैदानावर देवेंद्र सेवा महोत्सवाचा उपक्रम
बीड बायपास, ता. १३ ः देवेंद्र सेवा महोत्सवाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा जागर करणाऱ्या ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या ऐतिहासिक महानाट्याचे स्तंभपूजन रविवारी (ता. ११) जाबिंदा मैदान, बीड बायपास येथे झाले. हा महानाट्य कार्यक्रम सोमवार (ता. २६) ते रविवार (ता. एक) दररोज सायंकाळी सहा ते दहा होणार आहे.
या सोहळ्यास देवेंद्र सेवा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र साबळे, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण, सुहास शिरसाट, महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी आमदार संजय केणेकर, भाजपा शहराध्यक्ष किशोर शितोळे, बापू घडामोडे, राजू शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास, स्वराज्याची स्थापना, मावळ्यांचे शौर्य आणि हिंदवी स्वराज्यासाठी केलेल्या संघर्षाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने या महानाट्याचे आयोजन केले आहे. सदरील कार्यक्रम हा मोफत आहे.