‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्यासाठी शहरातील ११ मार्गांवर विशेष बसेस

‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्यासाठी शहरातील ११ मार्गांवर विशेष बसेस
Published on: 
‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्यासाठी शहरातील ११ मार्गांवर विशेष बस --- आजपासून एक नोव्हेंबरपर्यंत रोज सायंकाळी जबिंदा मैदानावर प्रयोग --- छत्रपती संभाजीनगर, ता. २५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी संकलनाच्या संकल्पनेतून आयोजित ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या महानाट्यासाठी छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या स्मार्ट शहर बस विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. शहरातील विविध भागांतील नागरिकांना महानाट्यस्थळी सहज पोचता यावे, यासाठी ११ मार्गांवर विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. २६ ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत बीड बायपासवरील जबिंदा मैदानावर रोज सायंकाळी सहाला हे महानाट्य होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह हर्सूल, हडको, रांजणगाव, वाळूज, चिकलठाणा आणि मिटमिटा परिसरातील नागरिकांना या बससेवेचा लाभ घेता येणार आहे. ---- असे आहेत बससेवेचे ११ मार्ग १. हर्सूल गाव : हर्सूल टी पॉइंट, जैस्वाल हॉल, गरवारे, सिडको, आकाशवाणी, मोंढा नाका, अमरप्रीत, सावकर चौक ते जबिंदा लॉन्स. २. हडको कॉर्नर : एसपीआय, टीव्ही सेंटर, एम-२, बळिराम पाटील, बजरंग चौक, चिश्तिया चौक, एमजीएम, सेवन हिल, गजानन महाराज मंदिर, जवाहरनगर पोलिस ठाणे, चेतक घोडा, सावकर चौक ते जबिंदा लॉन्स. ३. शहागंज : सिटी चौक, भडकल गेट, मिल कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, पदमपुरा, रेल्वेस्थानक, प्रतापनगर, दर्गा ते जबिंदा लॉन्स. ४. हनुमान टेकडी : पहाडसिंगपुरा, बीबी का मकबरा, बेगमपुरा, विद्यापीठ गेट, छावणी, कर्णपुरा, जय टॉवर, उस्मानपुरा, संत एकनाथ रंगमंदिर, भाजीवाली बाई चौक, प्रतापनगर ते जबिंदा लॉन्स. ५. रांजणगाव : बजाजनगर, मोरे चौक, ओयासिस चौक, महानगर-१, एएस क्लब, गोलवाडी टी पॉइंट, महानुभव आश्रम, बजाज हॉस्पिटल, एमआयटी कॉलेज ते जबिंदा लॉन्स. ६. वाळूज : गरवारे, बजाज, पाटोदा, हिंदुस्तान आवास, कांचनवाडी, महानुभव आश्रम, बजाज हॉस्पिटल, एमआयटी कॉलेज ते जबिंदा लॉन्स. ७. नक्षत्रवाडी : कांचननगर, कांचनवाडी, महानुभव आश्रम, बजाज हॉस्पिटल, एमआयटी कॉलेज ते जबिंदा लॉन्स. ८. चिकलठाणा (धूत हॉस्पिटल मार्ग) : धूत हॉस्पिटल, रामनगर, झेंडा चौक, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक, शिवाजीनगर, सूतगिरणी चौक ते जबिंदा लॉन्स. ९. चिकलठाणा (संजयनगर मार्ग) : रामनगर, संजयनगर, मुकुंदवाडी, सिडको चौक, कामगार चौक, जय भवानीनगर, हनुमाननगर, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर, जवाहरनगर पोलिस ठाणे, सहयोगनगर, सूतगिरणी चौक ते जबिंदा लॉन्स. १०. मिटमिटा : मच्छिंद्रनाथ मंदिर फाटा, तारांगण, हनुमान मंदिर, पडेगाव, पंचवटी, जय टॉवर, पीर बाजार, भाजीवाली बाई चौक, प्रतापनगर ते जबिंदा लॉन्स. ११. औरंगपुरा (संभाजीपेठ) : सावकर चौक, सिल्लेखाना, क्रांती चौक, मोंढा नाका, सेवन हिल, गजानन महाराज मंदिर, जवाहरनगर पोलिस ठाणे, सहयोगनगर, सूतगिरणी चौक ते जबिंदा लॉन्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com