
औरंगाबाद : दीड लाख शेतकऱ्यांना प्री-पेड मीटर
औरंगाबाद : राज्यात वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार कृषी वाहिन्यांचे ऊर्जा अंकेक्षण करण्यासाठी उच्चदाब वीज वितरण प्रणाली अंतर्गत वीजजोडणी दिलेल्या कृषी ग्राहकांना (शेतकऱ्यांना) प्री-पेड मीटर बसविण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. दीड लाख कृषी ग्राहकांना प्री-पेड मीटर बसविण्याची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. महावितरणकडून दरवर्षी सुमारे आठ ते नऊ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात.
सोबतच नादुरुस्त व इतर कारणांमुळे सध्या अस्तित्वात असलेले मीटर बदलणे आदींसाठी महावितरणला दरमहा दोन लाख साध्या मीटरची (प्रीपेड नव्हे) आवश्यकता भासते. सद्यःस्थितीत २२ एप्रिल पर्यंत महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक लाख ३१ हजार ८०२ मीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजमीटरच्या उपलब्धतेमध्ये आणखी वाढ करण्यासाठी येत्या सप्टेंबरपर्यंत तब्बल १५ लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचा आदेश पुरवठादारांना देण्यात आला आहे. त्यानुसार ३० एप्रिल पर्यंत एक लाख आणि मे महिन्यात दोन लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होतील.
प्रत्येक महिन्यात तीन लाख मीटर
जून ते सप्टेंबर पर्यंत प्रत्येक महिन्यात तीन लाख २७ हजार ५०० मीटर उपलब्ध होणार आहेत. या व्यतिरिक्त दहा लाख स्मार्ट मीटर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. दीड लाख थ्री फेज मीटर घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या थ्री फेज मीटरचा पुरवठा मे अखेरपर्यंत होणार आहे.
Web Title: Pre Paid Meters For Agriculture Farmers Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..